पुसद येथे जागतिक ग्राहक दिन साजरा!*..अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद पुसद तर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना बिस्कीट व फळ वाटप!*

 


*पुसद  येथे जागतिक ग्राहक दिन साजरा!*..अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद पुसद तर्फे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना बिस्कीट व फळ वाटप!*

राळेगाव दि.१५ (प्रतिनिधी धिरज खेडेकर):  आज दी.15मार्च 2022रोजी पुसद येथे जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदे पुसद शाखेच्या वतीने  दिव्यांग विद्यार्थी, तसेच  वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना  बिस्किट व करायचं फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अंध, दिव्यांग बाल कलाकार यांनी सुमधुर अशा गोड आवाजात भीम गीते  सादर करून सर्वांची मने जिंकली ,तसेच बाबासाहेब नाईक  वृद्धाश्रम येथे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना बिस्किट व फळांचे वाटप करण्यात आले, फळवाटप करताना ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांशी बोलताना आपले रक्ताचे रक्ताचे नाही तर कुणीतरी आपले स्वकीय आपणास भेटावयास आले व काहीतरी खाऊ घेऊन आल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले  येथील आश्रमात भावनिक असे वातावरण निर्माण झाले होते.

 ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित म्हणून

अखिल भारतीय ग्राहक कल्याण  परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख, डॉ. कयूम खान,तालुकाध्यक्ष मनीष दशरथकर ,तालुका उपाध्यक्ष कृष्णाजी राऊत, लक्ष्मण कांबळे, तालुका सचिव, कैलास श्रावणे, तालुका कार्याध्यक्ष,दिनेश खांडेकर, तालुका संघटक, फकीरा गायकवाड, अकिब रिजवी ,पुसद शहराध्यक्ष राजेश ढोले, शहर संघटक सुनील जाधव, प्रकाश खंडागळे , प्रा.अंबादास वानखेडे, बाबूलाल राठोड , प्रकाश खिल्लारे, शैलेश सकरगे इत्यादी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने