* त-हाडी येथे मृत वानराची अंतिमयात्रा
तऱ्हाडी,ता.शिरपुर ( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे ): रामभक्त हनुमान यांचे वरदान वानर या प्राण्यास मानवाचा पूर्वज समजले जाते .तसेच त-हाडी गावामध्ये किशोर पारधी या व्यक्तीने दोन-तीन वर्षापासून वानर पाळलेले होते खूप छान पद्धतीने त्या वानराची घरच्या व्यक्तीन प्रमाणे सांभार करत होता परंतु 26 फेब्रुवारी सकाळी त्याच्या अचानक मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली तसेच गावकऱ्यांनी पूर्ण गाव मिरवणूक काढली वानराची तिरडी सजवून पूजा करून गावातून वाजत गाजत अंतयात्रा करण्यात आली. त्यावेळेस तराडी ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते