साकळी येथील जि.प.मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

 साकळी येथील जि.प.मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप  



मनवेल  ता.यावलदि.२६ (वार्ताहर) समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत साकळी ता. यावल येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दि.२६ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष महाजन, सदस्य कैलास महाजन,पिंटू तडवी, किसन भोई ,नितिन फन्नाटे,शिक्षणप्रेमी सदस्य तथा ग्रा.पं.सदस्य दिनकर माळी, प्रभारी केंद्रप्रमुख किशोर चौधरी (सर),मुख्याध्याक किशोर सांळूखे(सर) यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान कोळी सर यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक भारत सर  शिवाजी सर व विद्यार्थी हजर होते.

     सदर शाळेच्या स्थापनेपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचा पांढरा शर्ट व खाकी पँन्ट असा शालेय गणवेश होता. शाळा स्थापनेपासून विद्यार्थ्यांचा गणवेश तोच असल्याने या गणवेशाला अनेक वर्षे झालेली होती त्यामुळे जि.प. शाळेतील विद्यार्थीही गणवेश बदलाच्या माध्यमातून आधुनिक शैक्षणिक  प्रवाहात यावा.म्हणून या वर्षाच्या शाळा व्यवस्थापन समितीने एकमत करून शालेय गणेशात मोठा बदल घडवून आणला आहे. हे विशेष !

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने