चोपडा येथे सात दिवशीय निःशुल्क योग शिबीर...


 



 चोपडा येथे सात दिवशीय निःशुल्क योग शिबीर...

   चोपडादि.२३ (प्रतिनिधी) :---

    मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगांव  अंतर्गत सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी च्या एम ए योगिक सायन्स अभ्यासक्रम अंतर्गत योग शिक्षिका गायत्री रविंद्र शिंदे यांचे सात दिवशीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. हिरालाल मोतीलाल करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे दि. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर शिबिराची वेळ सकाळी ५:३० ते ६:३० असणार आहे.

        योग शिक्षिका सौ गायत्री शिंदे यांना डॉ देवानंद सोनार ( संचालक - सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी , जळगाव ) , प्रा. पंकज खाजबागे , प्रा. गीतांजली भंगाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तरी सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त साधकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने