गुहागर प्रतिष्ठाणच्या वार्षिक २०२२ च्या दिनदर्शिकेचे गुहागरचे माजी आमदार ना. श्री. विनयजी नातू यांच्या हस्ते विरार येथे प्रकाशन

 




गुहागर प्रतिष्ठाणच्या वार्षिक २०२२ च्या  दिनदर्शिकेचे गुहागरचे माजी आमदार ना. श्री. विनयजी नातू  यांच्या हस्ते विरार येथे  प्रकाशन 


विरार दि.०३( प्रतिनिधी  शांताराम गुडेकर) :रविवार दिनांक : २ जानेवारी रोजी गुहागर प्रतिष्ठाणच्या वार्षिक २०२२ च्या  दिनदर्शिकेचे गुहागरचे माजी आमदार ना. श्री. विनयजी नातू,  गुहागर नगराध्यक्ष श्री. राजेशजी बेंडल व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते विरार येथे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी गुहागर नगराध्यक्ष श्री. राजेशजी बेंडल, रत्नागिरी जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. संतोषजी जैतापकर, नरेशजी जाधव, श्री. विनायकजी, नीलेशजी सुर्वे, श्री विनायकजी भोसले, श्री. मनोजजी राऊत, श्री. संतोषजी सोलकर,  रुतेशजी शिगवण, श्री. भरतजी गुजर, श्री. संजयजी पडवळ, श्री. संतोषजी कलमुडकर, श्री. संदीपजी कदम, सौ. अपेक्षा सूर्यकांत हळदणकर, सर एस के अँड ए डी, श्री दिपक मांडवकर (पत्रकार) आधी मंडळींच्या उपस्थिती दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला.तर गुहारगर प्रतिष्ठानच्या प्रत्येक ध्येय व उद्धिष्ठान मध्ये आम्ही सर्व सहभागही असून सदैव गुहागर प्रतिष्ठान सोबत असल्याची ग्वाही दिली. तर अनंता डॉ. विनय नातू यांनी सांगितले की, रुग्णवाहिका हा जर प्रतिष्ठाणचा विशेष सेवेचे लक्ष असेल तर या विषयी परिपूर्ण सहकार्य करून ही सुविधा अबाधित ठरवण्याचे नियोजन करू. तर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. योगेशजी कदम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात सर्व प्रतिष्ठाच्या सदस्यांनी सर्वात मोठी जबाबदारी उचलून कार्यक्रम संपन्न केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने