यावल येथे तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा


 यावल येथे तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

मनवेल ता. यावलदि.२७ ( प्रतिनिधी गोकुळ कोळी ) भारतरत्न डॉ . बाबासाहेब आबेंडकर व्दारे लिखित भारताच्या लोकशाहीतील राज्यघटना ही २६ जानेवारी १९५० रोजी देशात अमलात आली म्हणुन २६ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फारच महत्वाचा असुन , आज दिनांक २ ६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो .             यावल येथील तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रांगणावर आज २६ जानेवारी रोजी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले , या प्रसंगी माजी नगरसेवक तथा इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील , यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, पक्षाचे मुख्य नोंदणीकर्ता अजय बढे , तालुका उपाध्यक्ष सतिष आबा पाटील , काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे , माजी नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम रसुल, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , सेवा फाउंडेशनचे नईम शेख , शेख सकलेन, विक्की गजरे , अभिषेक इंगळे , विजय गजरे आदी कार्यकर्ते व पदधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने