*अनवर्दे बुद्रूक गावी शेतमजूराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..*
चोपडा, दि.०४ (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुद्रूक येथील रहिवासी अशोक साहेबराव पाटील यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.आत्महत्येचे कारणं मात्र समजू शकले
याबाबत अधिक माहिती अशी की, अनवर्दे बुद्रूक येथील अशोक साहेबराव पाटील यांनी घरातील लोकांचे कोणाचें लक्ष नसतांना राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन प्राण ज्योत मालवली.मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ वर्षे आहे.हीघटना सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली असून दिलीप माधवराव पाटील यांच्या खबरी वरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र.०/१३ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात ३मुली,१मुलगा, पत्नी असा परिवार आहे.अधिक तपास पोहेकाॅ लिलाधर भोई हे करीत आहेत.