जि.प.सदस्य प्रतापराव पोहचले लग्नात.. अन् आजी गहिवरल्या..!

 

जि.प.सदस्य प्रतापराव पोहचले लग्नात.. अन् आजी गहिवरल्या..!


पाळधी खु दि. २७(प्रतिनिधी)  येथील श्री बालकनाथ शंकर जगदाणे यांचा मुलगा चि.दिपक याचा विवाह चि.सौ.का.गायत्री हिच्याशी आज स्टॅटा वर पार पडला. 

आधीच गरीब परिस्थिती त्यात दिपकचे वडील बालकनाथ जन्मापासून मुके होते. म्हाताऱ्या आजीने मोठ्या कष्टाने दिपक ला शिकवले, मोठे केले. त्याला त्याच्या पायावर उभे केले आणि लग्न लावून दिले. 

जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी लग्नाला हजेरी लावून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. प्रतापभाऊंनी आजीची गळाभेट घेतली.  म्हाताऱ्या आजीचा आनंद गगनी मावत नव्हता.  गरीबाच्या घरी लग्न असले तरीसुद्धा जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी हजेरी लावली याचे कौतुक दोन्हीकडच्या नातेवाईकांमध्ये सुरू होते. याप्रसंगी पाळधी खु चे युवासेना शहरप्रमुख मनोज माळी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने