यावल तालुक्याला नुकसान भरपाई मिळावी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा
मनवेल ता.यावल,दि.०३ (प्रतिनिधी गोकुळ कोळी )
यावल येथे मागील काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, मका, कपाशी, सोयाबीन अशा अनेक खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते त्याचे पंचनामे सुद्धा प्रशासनाने करून सरकार कडे पाठवले होते सरकारने सुनशशशशशशशशश..शशशशद्धा मदत जाहीर केले होती तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई तसेच पिकविम्याची रक्कम जमा करण्यात येईल असे सांगितले होते तरी दिवाळी होऊन 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई तसेच पिकविम्याची रक्कम अजून प्रयन्त जमा झाली नसून सदर रक्कम येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
करावी अन्यथा यावल तहसील कार्यालया समोर दि.10/01/2022 वार सोमवार पासून आमरण उपोषण सुरू करू अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फौंडेशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार मा. आर. डी. पाटील यांना देण्यात आले यावेळी आपण शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी शासनपर्यंत आपल्या मार्फत पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सांगण्यात आले यावेळी प्रामुख्याने सरपंच परिचदेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे गावचे सरपंच
युवानेते संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे,शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, महेलखेडी सरपंच शरिफाताई तडवी,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, काँग्रेस सेवा फौंडेशनचे शहराध्यक्ष नईमभाई शेख, काँग्रेस सेवा फौंडेशनचे रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम सेठ शाह,काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा सरचिटणीस भूषण निंबायत, दहिगावचे माजी सरपंच सत्तार तडवी,कोरपावलीचे उपसरपंच प्रतिनिधी मुक्तार पटेल, कोरपावलीचे ग्राप सदस्य आरिफ तडवी, सिकंदर तडवी,वाढोदे गावचे उपसरपंच गोपाळभाऊ चौधरी,नानाभाऊ सोनवणे, चेतन सोनवणे, रहेमान खाटीक, अनिल जंजाळे, टाकरखेडा येथील अनिलभाऊ कोळी, आत्माराम महाजन, निसार भाई शेख, काँग्रेस सेवा फौंडेशनचे तालुकाउपाध्यक्ष याकूब खान, सह शेतकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, मदत पुनवर्सन मंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात येतील आणि आपण पण प्रशासना मार्फत पाठवाव्या अशी विनंती करण्यात आली.