यावल प.स.कार्यलयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभार

 



यावल प.स.कार्यलयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभार

           

मनवेल ता.यावल दि.२०( प्रतिनिधी गोकुळ कोळी ): यावल प.स.मधील घरकुल विभागातील कंत्राटी कर्मचारी मनमानी करीत असून ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक पिळवणूक करुन फीरवा फीरव करीत आहे.

ग्रामीण भागातील नागरीकां हक्कांचे घरकुल मिळावे म्हणून शासन शबरी ,आवास रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनासह विविध योजनाच्या माध्यमातून गरीबांची स्वप्ने साकार करण्यासाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे मात्र अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षमुळे  कंत्राटी कर्मचारी मनमानी कारभार करतांना दिसून येत आहे.

ज्या लाभार्थाना घरकुल योजनेच्या लाभ मिळाला आहे ते लाभार्थी घरकुलाच्या अनुदान मिळावे म्हणून पंचायत समीती मध्ये गेल्यावर कर्मचारी नियुक्त असलेल्या टेबल वर दिसत नाही तर  कुठे गेला तपास केला तर साधा भ्रमनध्वनी सागत नाही खेड्या गावातुन मिळेल ते वाहनाने लाभार्थी तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या आशेने येतात मात्र कर्मचारी टेबल चा ठिकाणी सापडत नसल्यामुळे ग्रामीण जनतेची पिळवणूक होत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूर असून घरकुलाच्या हप्ता( देय) वेळेवर मिळत नाही , काम पुर्ण झाल्यावर अंतिम हप्ता मिळण्यासाठी विविध कारणे सागतात व आर्थिक पिळवणूक करीत आहे याकडे गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालून अधिकारी व कर्मचारी कडुन गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक थांबावी अशी मागणी ग्रामीण भागातुन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने