3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय पहिली महिला शिक्षिका दोंडाईचा सावित्रीबाई फुले कन्या प्राथमिक शाळा येथे जयंती साजरी.

 




*3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय पहिली महिला शिक्षिका दोंडाईचा सावित्रीबाई फुले कन्या प्राथमिक शाळा येथे जयंती साजरी.      

 त-हाडी*दि.०३ `(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे)``स्वोधारक विद्यार्थी संस्थेचे राणी मासाहेब मनोबा देवी राऊळ व सावित्रीबाई फुले कन्या प्राथमिक शाळा तसेच गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज दोंडाईचा येथे आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री डी जी गिरासे सर हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला ज्ञानेसिंग गिरासे ह्या होत्या तसेच कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते तसेच शाळेतील वेगवेगळ्या इयत्तेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले,मासाहेब जिजाऊ,झाशीची राणी,ताराबाई कल्पना चावला,इ.महान स्त्रियांच्या वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले व तसेच त्यांनी आपापल्या वेशभूषे प्रमाणे मनोगत व्यक्त केले.काही विद्यार्थिनींना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला गिरासे मॅडम व उपमुख्याध्यापक डी जी गिरासे सर व श्रीमती एस डी राजपूत मॅडम, श्रीमती एम एस मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पी व्ही पाटील मॅडम व श्री आर के गिरासे सर यांनी केले.

आभार प्रदर्शन श्रीमती एस एस पाटील मॅडम यांनी केले```

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने