*बोरनार येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !*राजकीय फटकेबाजी करणारे जेव्हा क्रिकेट मध्ये सिक्सर मारतात तेव्हा ..….

 





*बोरनार येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !*राजकीय फटकेबाजी करणारे जेव्हा क्रिकेट मध्ये सिक्सर मारतात तेव्हा ..…..


*जळगाव, दिनांक २५ ( प्रतिनिधी )  :  - जळगाव तालुक्यातील बोरणार येथे क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंग केली. मंत्री पाटील यांनी षटकार मारल्या नंतर प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. एरवी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील क्रिकेट मध्ये देखील फटेकबाजी करत आहेत.*


बोरनार क्रिकेट क्लबतर्फे आजपासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे. आज सकाळी बोरनार येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते चेंडू टोलवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत अनुक्रमे ११ हजाराचे पाहिले,  ७ हजाराचे दुसरे आणि ५ हजाराचे तिसरे  पारितोषिके आहेत. यात जिल्ह्यातील सुमारे २० संघ सहभागी होणार आहेत. आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे म्हसावद येथील संघर्ष बी विरूध्द पारोळा येथील जय बजरंग या संघातील सामन्याचा टॉस करण्यात आला. नंतर पालकमंत्र्यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. 


*याप्रसंगी ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. हुकला तो संपला या गाण्याने क्रिकेटचे यथार्थ वर्णन केले असून आपल्या जीवनाला देखील हा नियम लागू होतो. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा, आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.*


याप्रसंगी पंचायत समितीच्या उपसभापतींचे पती समाधान चिंचोरे, म्हसावदचे सरपंच गोविंद पवार, बोरनार येथील सरपंचांचे पती नाना पाटील, उपसरपंच बापू थोरात, शिवसेनेचे सुनील बडगुजर, सुनील मराठे, इबा पठाण, आशिष पटेल, नारायण चव्हाण, सचिन दामले, क्रिकेटपटू नवल राजे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने