जळगाव येथे सोमवारी लोकशाही दिन होणार ..लसीकरण प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांच्याच स्वीकारणार तक्रारी

 




जळगाव येथे सोमवारी लोकशाही दिन होणार ..
लसीकरण प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांच्याच स्वीकारणार तक्रारी

        जळगाव, दि. 03 (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सोमवार 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑफलाइन पध्दतीने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने या दिवशी नागरिक प्रत्यक्ष येवून वैयक्तिक स्वरूपाचे तक्रारी अर्ज सादर करू शकतील. तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत असलेल्या नागरिकांचेच तक्रारी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने