आचार्य गरुड पुण्यतिथी निमित्त गणपूर विद्यालयात कार्यक्रम


आचार्य गरुड पुण्यतिथी निमित्त गणपूर विद्यालयात कार्यक्रम 

गणपूर ..उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले
 

         गणपूर,ता चोपडा (प्रतिनिधी) 23 : शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,विधान सभेचे तत्कालीन उपाध्यक्ष आचार्य गजाननराव गरुड व संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील विकास माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार ऍड बाळकृष्ण पाटील होते.         प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले,विस्तार अधिकारी वंदना बाविस्कर,प्रमोद बाविस्कर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पारे यावेळी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते आचार्य गजाननराव गरुड व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी एस बाविस्कर यांनी केले. शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांनी यावेळी शालेय उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांच्या हस्ते क्रीडास्पर्धेत मेडल पटकवणाऱ्या धनंजय भावसार याचा व पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्याध्यापक पी एस बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला.ए बी सूर्यवंशी,डॉ भावना भोसले ,ऍड बाळकृष्ण पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.रमेश सावकारे यांनी सूत्रसंचालन केले.उपस्थितांचे आभार डी बी पारधी यांनी मानले.कार्यक्रमाला माधवराव पाटील,उप सरपंच विजय भावसार,चंद्रसिंग पाटील,विजय पाटील,गुलाबराव पाटील ,बाळकृष्ण दीक्षित,संजय पाटील,भुपेंद्र पाटील,विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. .............

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने