चांदवडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक
चांदवड दि.१९ (प्रतिनिधी उदय वायकोळे): नरपरिषद मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते यांनी आज दुग्धभिषेक केला.कर्नाटक राज्यात घडलेल्या विटंबना प्रकारानंतर तेथील मुख्यमंत्री यांनी जे विधान केले त्याबाबत त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष श्री प्रकाश शेळके यांनी केली आहे.याप्रसंगी जेष्ठ नेते सुनीलतात्या कबाडे,अल्ताफ तांबोळी,सुनील अण्णा सोनवणे, भगतसिंग कटारीया आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.