*शिंदखेडयात माजी मंत्री तथा आमदार भाऊसाहेब जयकुमारजी रावल यांच्या शुभहस्ते "बिजासनी पेट्रोलियम" पेट्रोल पंपाचा भव्य उद्या शुभारंभ..*
शिंदखेडा दि.१९ (प्रतिनिधी) येथील टेमलाय फाटा होळ रोडावर उद्या दि.२० डिसेंबर रोजी ४:००वाजता माननीय आमदार तथा माजी रोहयो मंत्री भाऊसाहेब जयकुमारजी रावल यांच्या शुभहस्ते बिजासनी पेट्रोलियम पेट्रोल पंपाचा भव्य शुभारंभ होत असून सत्यनारायणाची महापूजा व तीर्थ प्रसादाचा आयोजन करण्यात आले आहे.
या पेट्रोल पंपावर खात्रीशीर पेट्रोल व डिझेल मिळणार असून वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
तरी कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन शिंदखेडा येथील जनतेच्या ह्रदयात सदा सर्वदा असणारे व्यक्तिमत्त्व व कार्यसम्राट नेतृत्व नगरसेवक गटनेते मा.श्री.रावसाहेब अनिलशेठ लालचंद वानखेडे अणि लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो.रजनीताई अनिलशेठ वानखेडे, इंजिनिअर भाऊसो.विनय अनिलशेठ वानखेडे,मा.श्री.दयारामजी देवराम माळी(ग्रामपंचायत सदस्य शिंदखेडा),मा.श्री.राजाराम देवराम माळी, भाजपा शहराध्यक्ष मा.श्री.भाऊसो.प्रवीणजी राजाराम माळी यांनी केले आहे.