विशाल व गौतमचा संबंध काय ? अमळनेरला जोरदार चर्चा

 



विशाल व गौतमचा संबंध काय ? अमळनेरला जोरदार चर्चा

अमळनेर दि.२६(प्रतिनिधी दीपक प्रजापती) : शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी थुंकण्याच्या कारणावरून एक भांडण झाले होते. शिरूड नाका भागातील कन्हैया चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बोर्ड होते ते काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त काढले गेले होते. त्या ठिकाणील ओट्यावर परिसरातील तरुण रात्री बसलेले असतात. मोठ्या गप्पांची मैफिल जमलेली असते. सर्व जातींचे तरुण येथे येऊन बसतात. मात्र त्या दिवशी ओट्याजवळ कोणी तरी थुंकलेले होते. त्या कारणावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. मात्र तो फायरिंग व चाकू हल्ल्यापर्यंत पोहचला…. व एकमेकांवर गुन्हे देखील दाखल झाले. दुसऱ्या गटातील काही तरुण पहिल्या गटाच्या तरुणांचे चांगले मित्र होते त्यांच्यावर देखील हे गुन्हे दाखल झाले. फिर्यादी असलेल्या दीपक उर्फ गिलिगिली पप्प्या याने देखील असे म्हटले आहे की, यातील काही तरुणांनी त्याला मारले देखील नाही. एक त्या ठिकाणी नव्हता…. मात्र ही नावे तेथे कोणी टाकली हे फिर्यादी असलेल्या दिपकला देखील माहीत नाही.

या फिर्यादीत आरोपी असलेला विशाल सोनवणे याच्यावर आधी गुन्हे होते. मात्र पोलिसांच्या, मित्रांच्या व नातेवाईकांच्या समजवण्याने विशाल सध्या गुन्हेगारीच्या वाटेवरून दूर होता. गेल्या दिढ ते दोन वर्षांपासून तो नौकरी साठी प्रयत्न करीत होता व अभ्यास देखील करीत होता. सुमारे दिढ ते दोन वर्षांनंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. तो तेथे होता मात्र त्याने मला मारले नाही असे फिर्यादीचे म्हणणे आहे. तर फिर्यादीत नमूद असलेला अजून एक आरोपी म्हणजे गौतम मंगल बिऱ्हाडे हा माझा चांगला मित्र आहे आणि तो तिथं नव्हता तसेच त्याचे नाव कोणी घेतले हे मला माहित नाही असेही फिर्यादीचे म्हणणे आहे.

या दोघांची नावे फिर्यादीने सांगितले नाहीत तर मग हा बनावट आरोपी बनवण्याचा अट्टाहास कोणी केला व त्याचा असे करून फायदा काय ???? तसेच काही अधिकारी यांची नावे टाकून काय साध्य करताय हा प्रश्न उपस्थित होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने