शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण उद्याची बैठक रद्द..आता होणार 5 डिसेंबर रोजी*


 



शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण उद्याची बैठक रद्द..आता होणार 5 डिसेंबर रोजी*
चोपडा दि.०२ (प्रतिनिधी):*चोपडा शिवसेनेची उद्याची होणारी  दि 3 डिसेंबर 2021 रोजीची  चोपडा विधानसभा मतदार संघाची बैठक रद्द करण्यात आली आहे...सदर बैठक 5 डिसेंबर 2021 रोजी ठिक दुपारी 2 वाजता बोथरा मंगल कार्यालय चोपडा येथे होणार आहे याची सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी नोंद घ्यावी...असे आवाहन सेनेतर्फे करण्यात आले आहे
सदर बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.दि 5 डिसेंबर रोजी त्याच ठिकाणी त्याच वेळी होणार असून फक्त तारीख बदलण्यात आली आहे हा महत्वपूर्ण बदल शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी लक्षात घ्यावा असेही कळविण्यात आले आहे

या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर *चोपडा तालूका व शहर शिवसेनेची व किनगाव डांभुर्णी व साकळी दहीगाव गटातील शिवसेनेची महत्त्वपुर्ण बैठक* चोपडा विधानसभेच्या आमदार माननीय सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार तथा रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख माननीय आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न होणार आहे,

तरी बैठकीस शहर व तालूक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने