हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिवसानिमित्त शिरपूरला गोर-गरीब,दीन-दुबळ्या लोकांना चादरी वाटप
शिरपूर दि.१७ (प्रतिनिधी हिराभाऊ कोळी)*आज दिनांक:-१७ नोव्हेंबर २०२१ रोजी हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या प्रतिमा पूजन करून स्मृतीदिवसानिमित्त हिवाळ्यात थंडीच्या दिवसात शिरपूर शहरात तसेच परिसरात उघड्यावर झोपणाऱ्या(राहणाऱ्याना) गोर-गरीब,दीन-दुबळ्या लोकांना चादरी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी शिरपूर शिवसेना विधानसभा क्षेत्र उपजिल्हा प्रमुख श्री.भरतसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक श्री.विभाभाई जोगराणा,तालुका प्रमुख इंजि.अत्तरसिंग पावरा,शहर प्रमुख श्री.देवेंद्र पाटील,एसटी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष श्री.रजेसिंग राजपूत(राजू टेलर),उपतालुका प्रमुख श्री.अभय भदाणे,श्री.मंगलसिंग भोई,उपशहर प्रमुख श्री.योगेश ठाकरे,युवासेना तालुका युवाधिकार श्री.विजय पावरा,युवासेना शहर युवाधिकारी श्री.गोलू मराठे,महिला आघाडी तालुका संघटिका सौ.अर्चना देसले,शिवशक्ती वाह.सेना जिल्हाध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील,युवासेना उपयुवाधिकारी श्री.जितेंद्र राठोड,श्री.नितीन निकम,श्री.विकास सेन,श्री.सुनिल सूर्यवंशी,श्री.दिनेश गुरव,श्री.तुषार महाले,श्री.शरद ईशी,श्री.पंकज शेटे,श्री.वावड्या पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.*