मुंबई दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन तर्फे दिव्यांग बांधवांना दिपावलीचे साहित्य वाटप

 






मुंबई दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन तर्फे दिव्यांग बांधवांना दिपावलीचे साहित्य वाटप

मुंबई दि.१२(प्रतिनिधी-) दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन मुंबई यांच्या वतीने दिपावलीचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह  सायन येथील धारावी भागातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना व स्थानिक पातळीवर पद नियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रत्येक दिव्यांग बांधवांना दिपावलीचे साहित्य  प्रा.भरत जाधव साहेब यांच्या हस्ते वाटप  करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष श्री.रमेश वरधवेली, महिला अध्यक्ष श्रीम.गीता सानप, मुंबई सचिव श्री.जितेंद्र घोडके, अंधेरी ता.अध्यक्ष श्री.जितेंद्र बापकर सायन ता.अध्यक्ष प्रकाश चावडा व आयोजक श्री..राजेश नामदेव घोलप व सर्व मुंबई टिम विशेष सहकार्य लाभले.   

धारावी चे कार्यसमाट शाखाप्रमुख आनंद भोसले  व युवा सेनेचे तोफ सायन विधान सभेचे श्री. प्रशांत  उपशाखा प्रमुख श्री.संतोष नाकटे .धारावी विधान सभेचे बहुजनांचे नेते श्री.शिवानंद काका बहुजन समाज पाटी. धारावी उपशाखा प्रमुख संजय धुरी  व गटप्रमुख श्री.निलेश परब  प्रमुख उपस्थित होते.मा.श्री. प्रसाद लाड (आमदार)साहेब यांचे सचिव व वा.अध्यक्ष मा.श्री.राहुल जाधव  उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने