शिरपूर वाघाडी रस्त्यावरील राज सागर हॉटेल जवळील प्राणघातक खड्डे बुजण्याचे काम भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष आबासाहेब राहुलजी रंधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातून केले पूर्ण *


 



*शिरपूर वाघाडी रस्त्यावरील राज सागर हॉटेल जवळील प्राणघातक खड्डे बुजण्याचे काम भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष आबासाहेब राहुलजी रंधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातून केले पूर्ण *

शिरपूर दि.१२(प्रतिनिधी हिराभाऊ कोळी) शिरपूर शहादा रस्त्यावर अतिशय जीवघेणे खड्डे असतांना त्याकडे शासनाचे कुठलेही लक्ष नसतांना, वाहन चालकांची व प्रवाशांची गाडी चालवताना संघर्ष करावा लागतो हे लक्षात येताच तालुक्याचे युवा नेते आबासाहेब राहुल रंधे व त्यांचे सहकारी मित्र मंडळांनी स्वतः कंबर कसून श्रमदानातू  पेव्हर ब्लॉक व खडी टाकून  खड्डे बुजण्याचे काम केले आहे. यावर लोकांनी व वाहन चालकांनी देखील सर्वांचे कौतुक केले.

. यावेळी राजसागर हॉटेल चे संचालक योगेश पाटील, हेमराज पाटील, निलेश महाजन, प्रमोद पाटील, गजू पाटील, बबन पाटील, भूषण पाटील, दिनेश धनगर, पंकज चव्हाण, विशाल तिरमले, राजू, वकील गोसावी, भुरा पाटील आदींनी श्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने