जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा..रावेरला राजकीय खेळी..तर भुसावळला अपक्ष उमेदवार विजयी*
जळगाव दि.२२ (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२१-२०२५ साठी सार्वत्रिक निवडणूक सहकार विभागाकडून घेण्यात आली. यात महाविकास आघाडीचे २० व भुसावळ येथील एका अपक्ष जागेवर आ. संजय सावकारे यांनी बहुमताने विजय प्राप्त केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदावर निवडून आलेल्या संचालकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तीन माजी पालकमंत्री, चार आमदार, एक महापौर असे प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करीत सहकार पॅनल ने वीस जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून प्रथम क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व त्यानंतर कॉंग्रेस अशा संचालकांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेसाठी रविवार २१ रोजी १५ तालुकास्तरावरील निवडणूक केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात विकास सोसायटी मतदार संघासह महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती -भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग व इतर संस्था आदी मतदार संघातून ४२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. या निवडणूकी सरासरी ९४.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला सोमवार २२ रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदारसंघनिहाय टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली. सर्वात शेवटी महिला राखीव मतदार संघातील मतमोजणीनंतर १ वाजेच्या सुमारास सर्व बिनविरोध व निवडणूक लढविलेल्या विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई केली. दरम्यान मतपत्रिका संकलन व मतमोजणी करतांना इतर संस्था व महिला राखीव मतदार संघाला सर्वाधिक वेळ लागला.
या निवडणूकी सर्वात मोठा धक्कादायक निकाल रावेर विकासाचो लागला असून राष्ट्रवादीने खेळी करत माजी आ. अरूण पाटील यांना महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल मधून त्यांचा उमेदवारी जाहिर केली. माजी आ.अरूण पाटील यांना भाजपाने पाठींबा जाहिर करीत पुरस्कृत केले. परंतु परंतु महाविकास आघाडीने यशस्वी खेळी करीत सहकार पॅनलमधील कॉंग्रेसच्या उमेदवार जनाबाई महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता. असे असले तरी ऐनवेळी झालेल्या मतदान प्र्रक्रियेत भाजप पुरस्कृत माजी आ अरुण पाटील यांचा केवळ १ मताने पराभव करीत जनाबाई गोंडू महाजन विजयी झाल्या तर भुसावळ येथील भाजपचे आमदार व अपक्ष उमेदवार संजय सावकारे यांना भुसावळ विकासो मधून विजयी घोषीत करण्यात आले.
जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारचे संतोष बिडवई यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गणेश कॉलनी शाखेजवळ महाविकास आघाडीपुरस्कृत सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
निवडून आलेले विजयी उमेदवार
या निवडणूकीत विमुक्त जाती -भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून मेहताबसिग रामसिग नाईक २३२६ विजयी, विकास ज्ञानेश्वर २८० तर ७८ मते बाद आहेत.
अनुसूचित जाती जमाती गटातून श्यामकांतदादा बळीराम सोनवणे २४६४ विजयी, नामदेव भगवान बाविस्कर यांना ८३ मते विजयी, तर प्रकाश यशवंत सरदार ६८,तर बाद मते ६९ आहेत. इतर मागसवर्ग गटातून डॉ.सतिष भास्करराव पाटील यांना २३१६ मते विजयी, विकास मुरलीधर पवार २४२, पाटील प्रकाश जगन्नाथ ४०, पाटील राजीव रघुनाथ २३ अशी मते मिळाली आहेत तर ६३ मते बाद आहेत. महिला राखीव गटातून ऍड. रोहिणी प्रांजल खडसे-खेवलकर यांना २२३५ मते, निकम शैलजादेवी दिलीपराव १९२५ (विजयी)असे दोन महिला उमेदवार विजयी, तर अरुण दिलीपराव पाटील ६२४, कल्पना शांताराम पाटील ११३, पाटील सुलोचना भगवान ११, पाटील शोभा प्रफुल्ल ६ मते मिळाली असून ६८ बाद मते आहेत. इतर संस्था गटातून गुलाबराव बाबुराव देवकर १६०१ मतांनी विजयी, रवींद्र सूर्यभान पाटील १८१, प्रकाश यशवंत सरदार १३, प्रकाश जगन्नाथ पाटील ७, उमाकांत रामराव पाटील ३ तर ५४ बाद मते आहेत. रावेर विकासो गटातून जनाबाई गोंडू महाजन २६, अरुण पांडुरंग पाटील २५, राजीव रघुनाथ पाटील ० तर बाद मते ३ आहेत. विकासो यावलमधून विनोदकुमार पंडितराव पाटील २५विजयी, गणेश गिरधर नेहते २२, प्रशांत लीलाधर चौधरी ० असे मतदान आहे. भुसावळ विकासो मधून संजय वामन सावकारे यांना २२ मते मिळून विजयी झाले आहेत तर शांताराम पोपट धनगर यांना ४ मते मिळाली असून एक मत बाद झाले आहे. चोपडा विकासो गटातून घनश्याम ओंकारलाल अग्रवाल ६३ मतांनी विजयी तर संगीताबाई प्रदीप पाटील आणि सुरेश शामराव पाटील यांना ० मते मिळाली तर एक मत बाद झाले आहे.
*बिनविरोध विजयी झालेले उमेदवार ,*
नामांकन अर्ज, छाननी व माघारीनंतर ११ उमेदवारांपैकी भडगाव विकासो मतदार संघातून प्रतापराव हरी पाटील, बोदवडमधून ऍड.रवींद्र प्रल्हादराव पाटील, पारोळा येथून आ. चिमणराव रूपचंद पाटील, पाचोरा येथून आ. किशोर धनसिंग पाटील, जामनेरमधून नाना राजमल पाटील, जळगाव मधून महापौर जयश्री सुनील महाजन, एरंडोल मधून अमोल चिमणराव पाटील, धरणगाव मधून संजय मुरलिधर पवार, चाळीसगाव मधून प्रदिप रामराव देशमुख, अमळनेर मधून आ. अनिल भाईदास पाटील, मुक्ताईनगर मधून माजी मंत्री तथा संचालक एकनाथराव गणपतराव खडसे बिनविरोध विजयी झालेले आहेत.