शेतकरी व शेतमजुरांना मिठाई भरून* *चोपडा काँग्रेसने कृषी कायदे* *रद्द झाल्याचा आनंद साजरा* *केला*.


 



*शेतकरी व शेतमजुरांना मिठाई भरून* *चोपडा काँग्रेसने कृषी कायदे* *रद्द झाल्याचा आनंद साजरा* *केला*.

*चोपडा दि.२० (प्रतिनिधी)*- केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड विजय झाल्याचा आनंद चोपडा येथे काँग्रेस पक्षाने मिठाई वाटून व्यक्त केला. चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षातर्फे मिठाई वाटप करण्यात आली. चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी शेतकरी व शेतमजुरांना स्वहस्ते लाडू खाऊ घातले. मिठाईचे वाटप पक्षाचे कार्यकर्ते यांनी केले. काँग्रेस पक्षाचे नेते सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, जिल्हा काँग्रेसचे नेते संदीप पाटील आणि समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांना चोपडा शहर व तालुका तर्फे धन्यवाद देण्यात आले . शेतकऱ्यांच्या धैर्याला सलाम केला .यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन करून जी चिकाटी धैर्य दाखवले त्याबद्दल शेतकऱ्यांना धन्यवाद देत  संविधानाचा जयघोष करण्यात आला. जय जवान जय किसान असे नारे देत काँग्रेस पक्षाने आनंद व्यक्त केला. यावेळी प्रदीप निंबा पाटील , नंदकुमार सांगोरे ,देवकांत चौधरी ,रमाकांत सोनवणे, किरण सोनवणे, इलियास पटेल, गोपीचंद चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शहराध्यक्ष श्याम भाई आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने