जळगाव सामान्य रुग्णालयात कोरोना योध्दयांसाठी वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे २हजार पीपीई कीट, २ हजारPPE चश्मे व पाच BI PAP मशीन साहित्य वितरण*


 

जळगाव सामान्य रुग्णालयात कोरोना योध्दयांसाठी वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे २हजार पीपीई कीट, २ हजारPPE चश्मे व पाच BI PAP मशीन साहित्य वितरण*

जळगाव, दि.२६(प्रतिनिधी):
संपूर्ण जग कोवीड-१९ च्या महामारीचा सामना करीत असताना डॉक्टर्स आणि नर्सेस अग्रस्थानी राहून कोविड १९ ग्रस्त रुग्णांची सेवा करीत अहोरात्र परिश्रम घेतले. यात अनेक कोरोना योद्धे कामी आले. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड रोगाशी लढण्यासाठी सज्ज राहता यावे म्हणून आणि या कोरोना योध्यांना पुरेसे संरक्षण मिळावे यासाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांना दोन हजार PPE कीट, दोन हजार PPE चश्मे आणि पाच BI PAP मशीन साहित्य वितरण करण्यात आले.

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मा. मुकुद नन्नवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात वर्ल्ड व्हिजन इंडिया करीत असलेले समाज कार्याचा उल्लेख करीत वर्ल्ड व्हिजन इंडिया कशाप्रकारे गरिबांच्या मदतीला धावून येते याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चव्हाण सर, जिल्हा शल्य चिकित्सक, यांनी देखील वर्ल्ड व्हिजन इंडिया करीत असलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करीत म्हणाले की उपलब्ध करून दिलेले साहित्य अत्यंत उच्च प्रतीचे आणि टिकणारे आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प अधिकारी अनिल तेजप्पा बल्लुरकर यानी संस्थेविषयी थोडक्यात माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुण्याचे स्वागत शाल आणि पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. बाळासाहेब सरोदे, डॉ. बडगुजर, डॉ. बन्सी, डॉ. सुफी डॉ. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने अश्विनी रॉबर्ट, विजय राऊत, आरती पाटील, रचना आदी आणि जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने