जिल्हा परिषद म्हसावद गटातून काँग्रेस च्या उमेदवार हेमलता अरुण शितोळे ह्या ५८०४ मतांनी विजयी
म्हसावद दि.०६:(प्रतिनिधी अब्बास भिल):म्हसावद जि.प. गटात एकूण मतदार १७ हजार ८८८ होते त्या पैकी १२६०१ मतदारानी मतदान केले. असून म्हसावद जिल्हा परिषद म्हसावद गटातून काँग्रेस च्या उमेदवार हेमलता अरुण शितोळे ह्या ५८०४ मतांनी विजयी झाले त्याच्या प्रतिस्पर्धी भाजपा चे उमेदवार शशिकांत गोविंद पाटील यांना २८८१,शिवसेना चे उमेदवार अब्दुल जब्बार शेख आझाद यांना १३९,राष्ट्रवादी चे उमेदवार सिताराम नूरला पावरा यांना ७५३ तर अपक्ष भगवान खुशाल पाटील यांना २६९६ असे मते मिळाले तर नोटा ३२८ असे मिळाले असून म्हसावद परिसरात एकच विषय चर्चिले जात आहे.म्हसावद येथील तीन स्थानिक उमेदवार अपक्ष भगवान पाटील,भाजपा चे शशिकांत पाटील तर शिवसेना चे अब्दुल जब्बार शेख आझाद हे होते मात्र काँग्रेस च्या उमेदवार हेमलता शितोळे या शिरूड येथील रहिवासी असून ते म्हसावद या गटात उमेदवारी केली आणि ते निवडून आल्या हे विशेच आहे स्थानिक उमेदवार निवडून आले नाही हा विषय परिसरात चर्चिले जात आहे.म्हसावद जि.प. गटात एकूण पाच उमेदवार होते त्यात चार पक्षाचे तर एक अपक्ष होते .म्हसावद जि.प. गटात चौरंगी लढत झाली.उमेदवारात अपक्ष,काँग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी यांच्यात चौरंगी लढत झाली. म्हसावद गटात एकूण आठ गावाचा समावेश होता.त्यात म्हसावद,पिंपरी,आमोदा, तलावडी,फत्तेपूर,रामपूर,इस्लामपूर, मडकानी यांचा समावेश आहे.हेमलता शितोळे ह्या विजयी झाल्याने त्यांचा जल्लोष करण्यात आला त्यांनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार टाकून अभिवादन केले.