*आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले साडे पाच कोटी रुपयांच्या रस्ता कामांचे उद्या भूमिपूजन सोहळा...*
चोपडा दि.०२(प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचा उद्या रविवार, दि. 3 ऑक्टोबर 2021रोजी भूमिपुजन सोहळा मा. श्री. विलास पारकर (संपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या शुभहस्ते आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे प्रमुख उपस्थितीत होत आहे.
यावेळी साडे पाच कोटी रुपयांचा दोन कामांचा समावेश आहे .
रामा-४ अंकलेश्वर बऱ्हाणपुर रस्ता किमी १६८/३३५ ते १७१/३३५ ता. यावल ( भाग गिरडगांव चुचांळे फाटा पर्यंत) ३ किमी रस्त्याचे चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ठिकाण : गिरडगांव वेळः स. १०:०० वा.अंदाजित रक्कम : १ कोटी ५० लक्ष (एक कोटी पन्नास लाख रुपये) व रामा-०४ ते शिरसाड ते पिळोदे रस्ता (इ.जि.मा.०९) ५ किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ठिकाण: शिरसाड वेळः स. १०:३० वा.अंदाजित रक्कम: ४ कोटी (चार कोटी रुपये) या दोन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे
कार्यक्रमास समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक चोपडा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.