कोरोनाच्या नावाने पर्यटकांकडून आर्थिक लूट.. म्हसावद पोलिसांचा प्रताप

काल्पनिक चित्र




 कोरोनाच्या नावाने पर्यटकांकडून आर्थिक लूट.. म्हसावद पोलिसांचा प्रताप 


म्हसावद ता.शहादा दि.२४(अब्बास भिल):-    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटकांवर गेल्या महिन्यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. त्या नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नियमाला शिथिलता दिल्यावर तोरणमाळ पर्यटन स्थळावर पर्यटकांची पाउले वळू लागली असून राणीपुर येथे म्हसावद पोलिसाकडून कोरोनाचे उल्लंघन च्या नावाखाली दोनशे रुपयांची आर्थिक वसूली करण्यात येत असल्याने पर्यटकांकडून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.


      पावसाळा सुरु झाला की महाराष्ट्र,गुजरात, मध्य प्रदेशातील अनेक पर्यटक तोरणमाळ पर्यटनस्थळी फिरण्यास येतात. काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती.पर्यटकांना तोरणमाळ पर्यटन स्थळावर येण्यास बंदी होती.मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हळू हळू जनजीवन पूर्व पदावर येत असून घरात बसून राहिलेले पर्यटकांना थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ पर्यटन स्थळ अनलॉक झाल्याने पर्यटन हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.परंतु राणीपूर येथे म्हसावद पोलीस ठाण्याअंतर्गत चेक पोस्ट लावण्यात आला आहे ज्या पर्यटकांकडे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असेल अश्या पर्यटकांना तोरणमाळ पर्यटन स्थळी जाऊ देण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली परंतु कोरोणाचे उल्लंघन च्या नावाखाली दोनशे रुपयांची पावती घेतली जात आहे आणि दोनशे रुपयांची पावती भरताच कोरोनाचे उल्लंघन दूर होत आहे का...? हा कसला नियम,अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यटक,वाहन धारक व रोजगारासाठी तोरणमाळ पर्यटन स्थळी जाणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी केली आहे.परंतु कोरोनाच्या काळ सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत असा प्रकार म्हसावद पोलीस स्टेशनंतर्गत सुरू असल्याने जनतेची एक प्रकारे मोठी लूट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून सामान्य जनतेची लूट थांबवा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.


■  म्हसावद पोलीस स्टेशन अंतर्गत तोरणमाळ येथे जाण्यासाठी वाहन चालकांकडून जो काही शुल्क घेतला जात आहे त्याबद्दल आम्हाला पर्यटक व वाहन चालकांनी सम्पर्क केला.शुल्क पोलीस विभागाकडून घेतला जात असल्याचे आम्हाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आलेली नव्हती आता आम्हाला माहिती झाल्याने आम्ही वरिष्ठांना त्याबाबत कल्पना देणार आहोत.


       :- एस.के.खुणे,वनक्षेत्रपाल अधिकारी,तोरणमाळ परिक्षेत्र



■तोरणमाळ पर्यटनस्थळी जाण्यासाठी लसिकरणाचे दोन डोस घेतल्याबाबत पर्यटकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिलेली नसल्याने पर्यटक अचानक पर्यटन स्थळी येत आहेत.परंतु लसिकरणाचे सर्टिफिकेट सोबत नसल्याने म्हसावद पोलीस स्टेशनकडून कोरोनाचे उल्लंघनच्या नावाखाली मोठी शुल्क आकारली जात आहे. शुल्क दिल्यानंतर तात्काळ वाहन पास केले जात आहे.यावरून नेमका काय प्रकार सुरू आहे याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.


   -  नरेश पवार,वाहन चालक तथा पर्यटक,मंदाणे,ता.शहादा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने