शहादा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांची बिनविरोध निवड
म्हसावद ,ता.शहादा दि.२४:(प्रतिनिधी):
शहादा पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज माघार घेतल्याने अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी बिनविरोध निवड घोषित केली.
ओबीसी आरक्षण रद्दबादल ठरवल्यामुळे येथील पंचायत समितीचे उपसभापती पद सात महिन्यांपासून रिक्त होते. त्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती . निवडणूक निकाला अंती पंचायत समितीत कॉंग्रेसचे १४, भाजपचे १२, राष्ट्रवादीचे दोन सदस्य असे संख्याबळ आले.
आज (ता.२४) येथील पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले त्यांना गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी सहकार्य केले.
प्रथम सकाळी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळेस भाजपचा कल्पना श्रीराम पाटील व कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांचे प्रत्यकी दोन तर राष्ट्रवादीच्या ललिता राजेंद्र बाविस्कर यांनी एक नामांकन अर्ज दाखल केले परंतु अर्ज माघारी वेळी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांची बिनविरोध निवड पीठासन अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी घोषित केली.
कॉंग्रेसला राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनीही सहकार्य केल्याने त्यांचे संख्याबळ सोळा झाले.निवडीनंतर कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित उपसभापती व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. सीमा वळवी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे, शहादा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, गणेश पाटील, शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील आदींसह कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.