चोपडा भाजपातर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त मोफत रेशन वाटप व सफाई कामगारांचा सन्मान



 



चोपडा भाजपातर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त मोफत रेशन वाटप व सफाई कामगारांचा सन्मान

चोपडा दि.०२(प्रतिनिधी)आज दि. 2 ऑक्टोबर संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय किसान जय जवान  च्या नाऱ्यातून देशाला हरित क्रांती घडवून आणणारे मा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने आज चोपड़ा तालुका भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण च्या वतीने महात्मा  गांधी स्मारकाला माल्य अर्पण करण्यात आले व देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 2.0 स्वच्छता अभियानांतर्गत जे सफाई चे खरे शिलेदार आहेत ते चोपड़ा नगरपालिकेचे  सफाई कामगार किशोर भगवान पवार ,राकेश नंदु भेंडवाल ,चद्रेश मनोज केसोरिया, भिमराव राजेंद्र बाविस्कर, दिनेश रमेश सिरसाळे, सतिश कांतीलाल चावरे, किशोर रामु सारवान या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार सन्मान व गौरव करण्यात आला व भावसार गल्ली येथील रेशन दुकानात जाऊन गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य व पिशवी देऊन गरिब कल्याण योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थी चा देखिल यावेळी सन्मान करण्यात आला 

यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल जिल्हा चिटणीस सौ रंजनाताई नेवे व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष  रविंद्र मराठे अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष संजय श्रावणी बुथ विस्तारक विजय बाविस्कर भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अमित तडवी तालुका कोषाध्यक्ष धर्मदास पाटील विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष दिनेश मराठे कुरबान तडवी अनुसूचित जमाती शहर अध्यक्ष अभिषेक सुर्यवंशी या सह भारतीय जनता पार्टी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने