निजामपूर येथील एम.आय.एम व बहुजन आघाडी पक्षाला मोठे भगदाड.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधवांचा पक्षप्रवेश
शिरपूर दि.२७(हिराभाऊ कोळी)
निजामपूर येथील एम.आय.एम व बहुजन आघाडी पक्षाला मोठे भग दाड लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधवांचा पक्ष प्रवेश केला आहे.
निझामपूर येथील असंख्य मुस्लीम बांधवांनी रात्री ८ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या धुळे येथील फार्म हाऊस (मल्हार बाग) येथे निजामपूर येथील अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव मा.ताहीर बेग मिर्झा भाई व अल्पसंख्यांक चे धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मा.सलीम भाई शेख यांच्या माध्यमातून निझामपूर येथील बहुसंख्य मुस्लीम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी एम.आय.एम व बहुजन आघाडी पक्षातील पदांचा व पक्षाचा त्याग करित बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे पाईकत्व स्वीकारून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी विजयी च्या घोषणा करीत आनंद व्यक्त केला.
यावेळी निजामपूर येथील अल्पसंख्यांक विभागात काही मान्यवरांची नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी१) निजामपूर शहर अध्यक्ष अल्पसंख्याक ..जुनेद फरीद शेख २) जैताणे शहर अध्यक्ष अल्पसंख्याक ..शाह नदिम इस्माईल ३) निजामपूर शहर उपाध्यक्ष युवक .आरिफ पठाण ४) निजामपूर शहर उपाध्यक्ष युवक .राजिक बेग मिर्झा .यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच यावेळी पक्ष प्रवेशा वेळी खालील प्रमाणे बहुसंख्य मुस्लिम बांधव शेख आशिक,राजिकबेग,आरिफ पठाण,अजर पठाण ,समिर लोहार,नविस पठाण,मतीन पठाण,सोहेल मिर्झा, रियाज मदारी, नुरा मदारी, मोहसिन पठाण, इसाक मिर्झा, अफजल पठाण, बबलुपठाण, सादिक शेख ,मौसिन खाटिक, यासीन शेख, मुर्तजा तांबोळी, अब्रार सैयद,मुश्ताक अली,इम्रान शेख अमन शेख,शकील शेख,गयास शेख, शोहेब शेख,फईम शेख,सुलेमान शेख, अरबाज शाह अशरफ पठाण,उमेर शेख,अकबर पिंजारी, मसुद शेख आदी व जैताणे गावातील असे शेकडो तरुण पक्ष प्रवेशासाठी उपस्थित होते.अशी माहिती निजामपूर येथील अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव मा.ताहीर बेग मिर्झा यांनी दिली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख श्री अविनाश राजाराम लोकरे यांनी प्रसिद्धीस दिली.