राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना चोपडा मुकबधीर विद्यालयात अभिवादन*
चोपडा दि.०३(प्रतिनिधी): 2 ऑक्टोबर 2021 रोजी स्व.तुळसाआई बहूउद्देशीय महिला मंडळ संचलित मुकबधीर विद्यालयात चोपडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक रविंद्र भवराळे(बडगुजरसर) प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केला. सर्व उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसा याची आजही गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक यांनी केले यावेळी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते