*"टीईटी" ची परीक्षा विचारात घेऊन पोटनिवडणूक लांबविता आली असती..* शिक्षणप्रेमी जगन्नाथ बाविस्कर यांची प्रतिक्रिया.
*चोपडा(प्रतिनिधी)* तब्बल दोन वर्षांनंतर टीईटीची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती,परंतु ३० ऑक्टोबरला देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. ही परीक्षा एक महिना पुढे म्हणजे २१ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे असे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. याचा अर्थ परीक्षांपेक्षा निवडणुका महत्त्वाच्या झाल्या आहेत.फक्त एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्यातील लाख्खों टीईटी परीक्षार्थींना वेठीस धरले जाणार आहे.आधीच पोर्टल प्रणाली प्रमाणे शिक्षक भरती होत असताना याआधीचे टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी नोकरीपासून वंचित आहेत.दोन वर्षानंतर होणारी परीक्षा एका पोटनिवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात येणे हा या परीक्षार्थींनीवर अन्यायच आहे.अशी परखड प्रतिक्रिया शिक्षणप्रेमी जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये व्यक्त केली आहे.
३१ ऑक्टोबरला टीईटीची परीक्षा घेतली जाणार होती म्हणजे यासाठीचे परीक्षा परिषदेतर्फे सर्व नियोजन झाले असणार, पण निवडणूक आयोगाच्या आडमुठे धोरणामुळे परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागणार.आतापर्यंत झालेला अभ्यास पुन्हा पुढिल एक महिनाभर सुरू ठेवावा लागणार.हा एक प्रकारे परीक्षार्थींची क्रुर थट्टा व छळच असून राज्यात अशा अनेक परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात येत असते.टीईटीची परिक्षा विचारात घेऊन पोटनिवडणुक लांबविता आली असती.याबाबत योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे.असेही मत श्री.बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.