*
चोपडा महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना*
चोपडा दि.३१(प्रतिनिधी) निवडणूक आयोग पूरस्कृत मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत,महाराष्ट्र राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केलेल्या शासन परिपत्रक क्रमांक -संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१२७/एसडी-६ नुसार,महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात "निवडणूक साक्षरता मंच" स्थापन करण्यात आला आहे.
या मंच द्वारा विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती व्हावी,त्यांच्यामध्ये भावी मतदार म्हणून नावनोंदणी व मतदान करण्याविषयी तसेच लोकशाही बाबत जागरूकता निर्माण करण्यासंबंधी विविध जागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.
*मंचच्या अध्यक्षपदी कु.छाया साहेबराव चित्ते,उपाध्यक्षपदी कु.तेजल राजेंद्र पाटील यांची तर,सदस्य म्हणून कु.मानसी शशिकांत साळुंखे, चि.मयूर गुलाबराव पाटील,चि.चंद्रकांत आबा महाजन,चि.लोकेंद्र नींबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली*
उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,प्रा.संदीप भास्कर पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
*निवडणूक प्रक्रिया प्रक्रिया नोडल अधिकारी प्रा.प्रशांत लक्ष्मण पाटील व सहायक नोडल अधिकारी प्रा.विशाल भानुदास पाटील यांनी सुरळित पार पाडली*
या वेळी प्रा.बबनराव रंगराव पाटील,प्रा.प्रमोद रामचंद्र पाटील,प्रा.अभिजित रविंद्र देशमुख, प्रा.विवेकानंद देवानंद शिंदे,प्रा.निवृत्ती भागवत पाटील,प्रा.दिपक देविदास करंकाळ,प्रा.संदीप भास्कर देवरे आदी. उपस्थित होते.