*यावल येथे अंकलेश्वर राज्य ** *मार्गांवर मनसेचे आंदोलन**
यावल दि.१४(प्रतिनिधी )13/09/2021 शहरातून जाणाऱ्या राज्यमंहामार्गांवर चोपड्याकडे जाताना खडकाई नदीच्या पुलाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांचे कडे निवेदन देऊन देखील, खड्डे बुजविण्यात आले नाहीत. म्हणून दि 13/09/2021 सोमवार रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्यात बसून *मनसेने* खड्याना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध घालून . रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली. जर तात्काळ खड्डे, दुरुस्त नं केल्यास या पेक्षा ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. या खडयंमध्ये पावसाचे पाणी साचते व वाहन धा रकास खड्याचा अंदाज नं आल्याने लहान मोठे अपघात , होणे नित्याचे आहे . जर एखादा मोठा अपघात झाल्यास जीवित हानी होऊ शकते. तेव्हा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून *महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल नं घेतल्यामुळे आज रोजी तेथे मनसे ने खडयात बसून आंदोलन केले त्यामुळे काही काळ दोघ बाजूची वाहतूक खोळ बली होती.आंदोलकांनी खडयांची पूजा अर्चा करीत श्राद्ध घातल्यानंतर पोलीस प्रशासनाने रस्ता मोकळा केला. या प्रसंगी मनसे चे जनहित जिल्हा अध्यक्ष श्री चेतन अढळकर. तालुका उपाध्यक्ष श्री शाम पवार. शहर अध्यक्ष श्री किशोर नन्नवरे. गौरव कोळी. विभाग अध्यक्ष आंबीत कच्ची. विपुल येवले. प्रतीक येवले. राज शिर्के. आकाश चोपडे, गणेश माळी कुणाल बारी कमलेश शिर्के सह, कार्यकर्त्याची उपस्तिती होती. रस्त्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी यावल पोलीस स्टे. चे पोलीस नि. श्री सुधीर पाटील, उपनिरीक्षक,जितेंद्र खैरनार, यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले
