चौबारी परिसरातून गाय व बैलजोडीची चोरी,
अमळनेर दि.२९ ( प्रतिनिधी) पोलीस जीवाचे रान करून गुन्हे नियंत्रित करण्याचे प्रयत्न करीत असले तरी मारवड पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अडचणी येतात.हे देखील समजून घेतले पाहिजे.
काल चौबारी येथील संजय नामदेव माळी यांचे सह अन्य शेतकऱ्यांचे पशुधन चोरी झाल्याने मारवड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
गत काही दिवसातील ही तिसरी घटना असून मारवड सह तालुक्यातील पशुधनाची चोरी करणारे निर्ढावले असल्याचे निदर्शनास येत आहे.
पाडसे शिवारातून संजय माळी यांचे सह अन्य शेतकरी बांधवांचे बैलजोडी, गाय, गोऱ्हा असे 55 हजार रुपयांचे पशुधन चोरट्यानी पळविले.
सपोनी जयेश खलाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन निकम अधिक तपास करीत आहेत.
रस्त्याच्या कडेला व निष्काळजीपणे गुरे ढोरे बांधू नयेत व त्या त्या परिसरातील शेतकऱयांनी परस्पर संघटित होऊन एखादा रक्षक आळीपाळीने ठेवायला हवा असे आवाहन वाढत्या पशुधन चोरी नंतर करण्यात येत आहे.