गाढोदा येथे गणेशोत्सवनिमित्ताने बाल गणेशांकडुन विविध कार्यक्रम सोत्साहात*



 

गाढोदा येथे गणेशोत्सवनिमित्ताने बाल गणेशांकडुन विविध कार्यक्रम सोत्साहात*

गाढोदा दि.20( प्रतिनिधी गणेश सोनवणे)

गणेश उत्सव निमित्ताने गाढोदा येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण ,वृक्ष संवर्धन तथा, बुद्धिमत्ता चाचणी आदी  कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिनांक 19 वार रविवार  रोजी सकाळी 11 वाजता गावातील  सरपंच योगेश रमण पाटील यांचा हस्ते वृक्षारोपण व बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पाटील उपाध्यक्ष आकाश पाटील खजिनदार रोहन पाटील व समस्त ग्रामस्थांनी व विविध मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने