मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या गुरुवारी श्राध्द सोहळा
मनवेल ता यावल (वार्ताहर ) हजारो दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या यांच्या श्राध्द सोहळा ३० सप्टेंबर रोजी मनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धुनीवाले दादाजी दरबार मनवेल ३० सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता आरती, आठ वाजता सेवा, दहा वाजता होम ,हवन ,सेवा व दुपारी बारा वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक ,रात्री आठ वाजता महाआरती व रात्र भर ठिक ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे.
श्री रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे काही दिवस वास्तव्य केले आहे.भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीला त्यानी १९३९ या वर्षी मध्य प्रदेशातील बर्हानपुर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली त्या दिवसा पासून मनवेल गावी श्री स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
वरण पोळी व गंगाफळची भाजी महाप्रसादच्या मेनु आहे.गंगाफळची भाजी प्रसिद्ध असुन कार्यक्रमात आलेले भावीक भाजी प्रसाद म्हणून घरी नेतात व आवडीने खातात. याठिकाणी दिवसभर भावीकांसाठी साकळी या गावात बापु धोबी या दादा भक्त गणासाठी मोफत शिरा वाटप करतात तर महर्षि वाल्मीक मित्र मंडळ मनवेल यांचा मार्फत पोहे वाटप तर चहा वाटप व रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात येत असुन साकळी - मनवेल दरम्यान मोफत प्रवाश करीता वाहन व्यवस्था करण्यात येत असते.
या कार्यक्रमासाठी साकळी शिरसाड थोरगव्हाण पथराडे शिरागड पिळोदा खुर्द दगडी या गावातील भावीकांचे सहकार्य लाभते.
*कोवीड १९ चे नियम पाडण्यांचे आवाहन* या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भावीकांनी कोवीड १९ च्या नियमांचे पालन करावे मास्क लावून रांगेत सुरक्षित अंतर ठेऊन दर्शन घ्यावे असे आवाहन श्री दादाजी भक्तगण मनवेल दगडी गावातील ग्रामस्थांनी केले आहे,