*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे*
चोपडा दि.२८ (प्रतिनिधी तालुका कैलास बाविस्कर):
चोपडा मतदार संघात अत्यंत कमी पर्जन्यमान असल्याने जिरायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यात पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली असून उडीद, मुग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
तसेच माहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने बागायती कापूस पिकांचे देखील नुकसान झालेले आहे.
तरी या बाबींचा विचार करता तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.अशी सूचना आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी एका पत्रकान्वये जिल्हाधिकारी यांना केली आहे
यावर्षी पर्जन्यमानाचा लहरीपणा पणाने संपूर्ण हंगाम हा हातचा गेल्याने बळीराजा वर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे तरि शेतकरी हवालदील झाला आहे त्यांच्या शेतीचे नुकसानीचा पंचनामा तात्काळ करावा असेही आ.सौ.लताताई सोनवणे यांनी म्हटले आहे.