प्रेमि युगलाची वाडे शाळेच्या स्लॅबला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या..विवाहास समाज मान्यता नसल्याने बाब येते आहे पुढे.. पोलिस पाटलांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा..*


 


*प्रेमि युगलाची वाडे शाळेच्या स्लॅबला  दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या..विवाहास समाज मान्यता नसल्याने बाब येते आहे पुढे.. पोलिस पाटलांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा..* 


भडगाव दि.०१(प्रतिनिधी): तालुक्यातील वाडे विद्यालयातच शनिवारी रात्री दोघा तरुण-तरुणींनी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मुकेश कैलास सोनवणे (22, रा. वाडे, ता. भडगाव) व नेहा बापू ठाकरे (19, रा.वाडे) असे मयत तरुणीचे नाव आहे. विवाहाला समाज मान्यता मिळणार नाही याच्या भीतीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. माध्यमिक विद्यालयातील पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन स्लॅब घ्या सळईला दोर बांधून   दोघा तरुण-तरुणींनी गळफास आपली जीवनयात्रा संपविली. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून भडगाव पोलिसात  अकस्मात मृत्यू नोंद 37/2021,crpc 174 करण्यात आली. तपास उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने