कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी छोटू वारडे यांची २५ कुटुंबीयांसाठी मदत*

 



*कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी छोटू वारडे यांची २५  कुटुंबीयांसाठी मदत*       

चोपडा दि.०१(प्रतिनिधी)           शहरातील एस. के.नगर भागातील रहिवासी भगवान भाऊलाल उर्फ छोटू वारडे या राज्यात गौरवलेल्या विशेष छायाचित्रकाराने आपल्या  औदार्यचा हात पुढे करून, कोकणातील पूरग्रस्त 25 कुटुंबांसाठी मदतीचे पॅकेज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रवाना केले आहे. त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील यांनी कौतुक केले आहे. पंचवीस कुटुंबीयांना चादर,कंगवा,कपडे,स्नान साबण,कपडे धुण्याचे साबण,तांदूळ व 25 ड्रेस,कपडे, शर्ट,पॅन्ट व बिस्किटे असे जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेज तालुका अध्यक्षांकडे सुपूर्त केले आहे.शहरातील काही दात्यांनी दिलेली मदत स्वतः आपण जाऊन समक्ष गरजू बांधवांना देणार असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.छोटू वारडे हे ग्राहक संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख असून फोटोग्राफर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने