पथराडे येथे कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रतिसाद


 


पथराडे येथे कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रतिसाद


मनवेल ता.यावल (वार्ताहर ) येथून जवळच असलेल्या पथराडे येथे थोरगव्हाण आरोग्य उपकेद्र व ग्रामपंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने कोवीड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली असुन येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

 साकळी प्राथमिक आरोग्य केद्रां अंतर्गत थोरगव्हाण उपकेद्राचे सी.एच.ओ.डाँ सय्यद गजाला , पथराडे ग्रामपंचायत सरपंच योगिता सोनवणे ,ग्रामपंचायत सदस्यं प्रतापदादा सोनवणे ,दिनकर धिवर, ग्रामसेवक भरत पाटील  यांचा मार्गदर्शनाखाली कोविशिल्ड प्रतिबंधात्मक लसीचे डोस येथील नागरिकांना देण्यात आली.

लसीकरण शिबीर यशस्वीतेसाठी साकळी प्राथमिक आरोग्य केद्रांतील डाँ सागर पाटील ,डाँ स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केद्रांतील सुपरवायझर सौ.पाचपांडे ,आरोग्य सेवक मंकरद निकुंभ, आशा स्वयमसेविका माया धिवर यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने