दोंडाईचा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन....**विविध मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर फलकाचे अनावरण...*

 


*दोंडाईचा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन....**विविध मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर फलकाचे अनावरण...*

*दोंडाईचा-दि.०२(प्रतिनिधी)* येथे आज दि.१ऑगस्ट २०२१ रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बहुजन रयत परिषद (संचलित) लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे मातंग समाज विकास मंडळ दोंडाईचा तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नबूभाई पिंजारी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, नगरसेवक संजय मराठे, आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, माजी आरोग्य सभापती प्रतिनिधी जितेंद्र गिरासे, भाजपाचे जिल्हा पदाधिकारी पंकज चौधरी, नरेंद्र बाविस्कर, जयंत बोरसे, पत्रकार संतोष कोळी, वसंत कोळी, युवराज थोरात तसेच कार्यक्रमाचे आयोजक बहुजन रयत परीषद ( संचलित ) लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे मातंग समाज विकास मंडळाचे पदाधिकारी रविंद्र ईशी, योगेश जाधव, अजय जाधव, छोटु जाधव,अशोक ईशी, जितु निकाळजे, राज ईशी, अजय ईशी, राकेश ईशी, सागर म्हस्के,समाधान निकाळजे, महेंद्र वैराळे आदी समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे नगर फलकाचे अनावरण करण्यात येऊन, मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये यांनी समाज बांधवांना शुभेच्छा देऊन अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले. तर आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना  लहानपणातच अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागल्यामुळे त्यांनी फक्त दिड दिवसाचेच शिक्षण घेतले होते. अशा परिस्थितीत देखील त्यांनी दारिद्र्याचे चटके सहन करत प्रतिभावंत शाहीर, साहित्यिक म्हणून नावलौकीक मिळविला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःला दीन दलित समाजाच्या उन्नतीसाठी तसेच तळागाळातील सर्वसामान्य समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी. यासाठी आपले मोठे योगदान दिलेले आहे.कथा , कादंबऱ्या यांच्या माध्यमातून तसेच गावोगावी फिरून डफ वाजवून  आपल्या शाहिरीने सामाजिक जनजागृती चे काम केले आहे. समाजाने देखील त्यांचा आदर्श घेऊन त्यांचा विचारांवर चालले पाहिजे.अस्पृश्य,  तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांची शिक्षणाशिवाय प्रगती नाही. शिका,संघटीत व्हा आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करा. हया डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूळ मंत्राचा आदर्श घेत समाजाने शिक्षणावर भर देऊन सामाजिक प्रगती साधली पाहिजे. तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज चौधरी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने