राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरणात १७६ प्नकरणे निकाली तर एकूण वसुली ६,५८,३२७६ रुपये
चोपडा (प्रतिनिधी)-- मा. उच्च न्यायालय मबुई व मा. विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये दि.१ आगस्ट रविवार रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण २९४ पैकी १६ तर ग्रामपंचायतीचे दाखल पूर्व २७६८ पैकी १०७ प्रकरण निकाली बँक,म.रा.वी.म.,बीएसएनएलच्या दाखलपूर्व ११८३ प्रकरणापैकी ५३ प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली ६५८३२७६ रुपये झाले.
सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतला सुरवात झाली यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश डी. जी. म्हस्के यांच्या सोबत ऍड. धर्मेंद्र एस.सोनार, वकील संघाचे अध्यक्ष ऍड.किरण जाधव आदी होते
चोपडा न्यायालयतील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण २९४ ठेवण्यात आले होते त्यातून दिवाणी ३ प्रकरण, फौजदारीचे १३ प्रकरणे अशी एकूण १६ प्रकरणें निकाली काढण्यात आले यात २२५२७९४ रुपये वसूली झाली तसेच तालुक्यातील ग्रामपंचायति चे एकूण २७६८ प्रकरणे लोक अदालत मध्ये ठेवण्यात आली होती यातून १०७ प्रकरण निकाली करण्यात आले त्यात एकूण २८०७०१ रुपये वसुली करण्यात आले. बॅंक ऑफ इंडियाचे ५१ प्रकरणातून ३ प्रकरण निकाली झाले यात १५५०० रुपये वसूल करण्यात आले. बॅंक ऑफ बडोदाचे शाखा चोपडा ४१५ प्रकरणातून ३ प्रकरण निकाली झाले यात ९६७००० रुपये वसूल करण्यात आले धरणगाव अर्बन को. ऑफ.बॅंक लि.चे २० प्रकरणातून ७ प्रकरण निकाली झाले यात १४७००० रुपये वसूल करण्यात आले स्टेट बॅंक ऑफ इंडिया अडावद ३६५
प्रकरणातून ६ प्रकरण निकाली झाले यात ९९०५०० रुपये वसूल करण्यात आले स्टेट बॅंक ऑफ इंडिया चोपडा १४२ प्रकरणातून ८ प्रकरण निकाली झाले यात १३३१००० रुपये वसूल करण्यात आले स्टेट बॅंक ऑफ इंडिया लासुर ६० प्रकरणातून ८ प्रकरण निकाली झाले यात १५३५०० रुपये वसूल करण्यात आले स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद चोपडा ४२ प्रकरणातून २ प्रकरण निकाली झाले यात १२०००० रुपये वसूल करण्यात आले बॅंक ऑफ महाराष्ट्र ४२ प्रकरणातून ६ प्रकरण निकाली झाले यात २९८००० रुपये वसूल करण्यात आले मराविमडळ शहर १६० प्रकरणातून १ प्रकरण निकाली झाले यात ५१२० रुपये वसूल करण्यात आले मराविमडळ ग्रामीण २८० प्रकरणातून ४ प्रकरण निकाली झाले यात ११३९० रुपये वसूल करण्यात आले बीएसएनएल ५९ प्रकरणातून ५ प्रकरण निकाली झाले यात १०७७१ रुपये वसूल करण्यात आले एकूण दाखल पूर्व प्रकरणात ४३३०४८२ रुपये वसूल करण्यात आले तर दाखल प्रकरणातून २२५२७९४ रुपये वसूल करण्यात आले एकूण ६५८३२७६ रुपये वसूल करण्यात आले या दाखल गुन्ह्यात नवरा - बायकोचे चार प्रकरण तडजोड करण्यात आले तसेच शेतीच्या बांधावरील वाद २०११ ते २०१८ पासून महसूल विभागात सुरू पेडींग होता तो वाद चोपडा न्यायालयात २०२१ ला दाखल करण्यात आला होता तद्नंतर आज रोजी लोक अदालत मध्ये ठेवला असता तो दावा निकाली काढण्यात आला त्यामुळे जुना वाद देखील न्यायालयात मिटविण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे .सचिव ऍड. विलास डी. बाविस्कर, उप सचिव दिपक पाटील, उपाध्यक्ष मिलींद बाविस्कर, कोषागार नितीन कोळी, ऍड. प्रसाद काबरे, ऍड.एस.एफ.जैन, ऍड.प्रवीण एच.पाटील, ऍड.एस.एम.बारी,ऍड.उमेश बी.पाटील, ऍड.बी.सी.पाटील,ऍड.नितीन पाटील,ऍड.ऐ.व्ही.जैन तसेच बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यानी व वरीष्ठ लिपिक दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर आदिंनी सहकार्य केले