*मदतगार चोपडा तालुका लोक सहभाग चळवळीतून सात लाख रुपयांचे साहित्य कोकणातील पूरग्रस्तांना मदत रवाना..*
चोपडा दि.०१(प्रतिनिधी):कोकणातील पूरग्रस्तांच्या बातमीने सारा देश हादरला,नेहमीप्रमाणे चोपडा तालुक्यातील प्रत्येक संकटात मदत करणाऱ्या दात्यांचे सहभागाने २५०कुटुंबासाठी किमान पन्नास कुटुंबाला(४ व्यक्ती) पंधरा दिवस पुरेल एवढे तरी गृहपयोगी सामान पाठवायचे ठरले व लाख रुपयांचे सामान आज रवाना झाले.त्या रथाचे पूजन शहर पोलिस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम भाऊ अग्रवाल यl व ए पी आय अराक,नायब तहसीलदार लोमटे,नायब तहसीलदार पोळ, डॉ पंकज पाटील, डॉ गुरुप्रसाद वाघ,यांचे हस्ते व पोलीस कॉन्स्टेबल विलेश सोनवणे, श्री रमेशनाना सोनवणे,प्रा एस ई शिसोदे, श्री पंकज बोरोले,श्री चंद्रशेखर पाटील,श्री के एन महाजन,श्री नंदकिशोर सोनवणे,एस बी पाटील,श्री अशोक साळुंखे,शेख आरिफ शेख सिद्दिक, श्री सऊद बागवान,श्री मुन्ना सोमाणी,मनीष महाजन,श्री संजीव बाविस्कर, प्रा रमेश वाघजाले,प्रा भरत महाजन,श्री धनंजय पाटील ,श्री संजय बोरसे, पंकज पाटील, महेंद्र भोळे, उपस्थितीत झाले या उपक्रमासाठी गेले आठवडाभर मेहनत घेवुन पॅकेट तयार करणाऱ्या सौ शुभांगी पाटील,सौ हेमाताई बोरोळे,सौ कांचन भोळे,सौ सुवर्णा पाटील,सौ संगीता पाटील, सौ. मिरा बाई महाजन,सौ दिपाली बोरोले,सौ भारती पाटील, कू.स्नेहल पाटील,सौ अश्विनी पाटील,भाग्यश्री पाटील,श्रीमती नलिनी महाजन यांचेसहप्रत्यक्ष मदतीसाठी जाणारे व या प्रकल्पाचेप्रमुख कार्यकर्ते कुलदीप पाटील,रमाकांत सोनवणे, धीरज महाजन,विपीन बोरोले,सागर पाटील,निरंजन पाटील,सौरभ भोळे,मानस भोळे,स्वप्नील महाजन, सिद्धू पाटील, हरीकेश पाटील, तीलक पाटील,नितीन निकम,प्रा भरत महाजन हे चिपळूण कडे रवाना झालेत.
