गुजरी जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम..*अध्ययन कट्टा ' च्या माध्यमातून शिक्षणाची रुजूवात*

 गुजरी जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम..*अध्ययन कट्टा ' च्या माध्यमातून शिक्षणाची रुजूवात*



राळेगाव दि.३०


( प्रतिनिधि चेतन दुगे ):

'बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु' असा प्रत्यय यावा असा एक अभिनव 'अध्ययन कट्टा ' तालुक्यातील गुजरी गावात सुरु आहे. शिक्षक, पालक व गावातील शिक्षित शिक्षकमित्रांच्या मदतीने या अभिनव उपक्रमाची सुरुवात इथे झाली. कोरोना नियमावलीचे पालन करून राळेगाव तालुक्यातील गुजरी गावात अद्यापनाचे कार्य सुरु आहे. प्रामाणिक इच्छा असली की मार्ग निघतो हे सुभाषित येथली जि. प. शाळा उपक्रमशील शिक्षक, जागृक पालक व शिक्षित मित्रांनी प्रत्यक्षात खरे करून दाखवले.

           गुजरी येथे प्रशस्त सभागृह आहे. या ठिकाणी शाळेतील विध्यार्थी शिक्षण घेत आहे. एक दिवसाआड वर्गा प्रमाणे विध्यार्थी इथे येतात. गटात त्यांना शिकण्यात येते. शिक्षक, गावातील शिक्षित वेक्ती हे त्यांना शिकवतात. गावातील नागरिकांनी वारंवार शाळा सुरु करण्याची मागणी केली. मात्र नियमानुरूप शाळा सुरु होऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून व विधार्थीयांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने जि. प. शाळा गुजरी व गावातील नागरीक यांनी ग्रा. प. कडे अध्ययन कट्टा हा उपक्रम सुरु करण्याची परवानगी मागितली. ती देण्यात आली. पालकांनी या कामी पुढाकार घेतला. योगायोगाने गावाच्या मध्यभागी प्रशस्त सभागृह या कामी आले. या ठिकाणी शिक्षक, गावातील शिक्षित वेक्ती, यांच्या मदतीने अध्यापन सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोना नियमाचे पालन करून मास्क आदीचा वापर करून विध्यार्थी शिक्षण घेत आहे. 50 टक्के शिक्षक उपस्थिती चा निर्णय असतांना शिक्षक पूर्ण आठवडा उपस्थित राहून शिक्षणाच्या मार्गातील कोरोना रुपी अडथळे दूर सारण्याकरिता प्रयत्न करीत आहे.   

          उपक्रमशील शिक्षक मनिष काळे यांच्या संकल्पनेतून याला मूर्त रूप आले. केंद्रप्रमुख शेळके सर, मुख्याध्यापक डोंगरे सर व  शाळेतील सर्व शिक्षकांनी या कामी पुढाकार घेतला.ग्राम शिक्षण समिती सह अध्ययन कट्टा हा आनंददायी शिक्षण देणारा उपक्रमा बाबत  पालकांनी समाधान वेक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने