*श्री. स्वामी समर्थ केंद्र, चांदवड येथे मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान मोठ्या उत्साहात संपन्न.*
चांदवड दि.३१. :( सुनिल आण्णा सोनवणे )) येथील योगदर्शन फाउंडेशन,चांदवड संचलित योग विद्या धाम, चांदवड आयोजित आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन दिल्ली, व पारस मिरॅकल, नगर यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात प्रथमच चांदवड तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र , चांदवड येथे मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री स्वामी समर्थ केंद्रप्रमुख व अध्यक्ष श्री. बाळासाहेब शेळके व योगदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष व योग विद्या धाम, चांदवडचे केंद्रप्रमुख व योग प्रशिक्षक राहुल (अंबादास) बी. येवला उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते मोफत जलनेती पात्रांचे वाटप करण्यात आले.
योग प्रशिक्षक राहुल बी. येवला यांनी जलनेती ही नासिकामार्गाची शुद्धिक्रिया कोविड १९ या व इतर संसर्गजन्य आजारासाठी तसेच श्वसनाच्या विकारांवर कशी प्रभावी आहे याचे प्रात्यक्षिकासह महत्व विशद केले. त्यानंतर राहुल येवला यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे विश्वस्त पदाधिकारी व स्वामी सेवेकरी यांनी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत वेगवेगळ्या गटात जलनेतीचा प्रात्यक्षिक अभ्यास केला. शेवटी सर्व लाभार्थी सेवेकर्यांनी जलनेती हि शुद्धिक्रिया आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त व फायदेशीर असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रप्रमुख व अध्यक्ष श्री. बाळासाहेब शेळके यांनी आपल्या भाषणात जलनेती व योगाभ्यास हा कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी उपयुक्त आहे, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. व राहुल येवला यांनी पुढे होण्याऱ्या योग, प्राणायाम व जलनेती शिबिरासाठी इच्छुक नागरिकांनी ९३७०३८२९४२/७३८५२१६९५१ वर संपर्क साधावा असे सांगितले..
शिबिराच्या आयोजनासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वामी शिवानंद महाराज व नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्षा डॉ. तस्मिना शेख, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी केंद्राचे उपाध्यक्ष दादाजी अहिरे, सचिव गंगाधर सोनवणे विश्वस्त सदस्य रामदास आलई, नेमीचंद जैन, उत्तम जाधव, हरीश जगताप, विलास होळकर, देवदत्त बच्छाव,गणेश शेळके, विमल शेळके, गणूकाका सोनवणे, अमोल गायकवाड, प्रवीण मेतकर, ईश्वर बोटवे, महेश सोनवणे, शुभम कोतवाल, वंदना ठाकरे डॉ. सुनीता अग्रवाल, चैताली कोतवाल, प्रभाकर खंदारे, अमोल बिरारी, योगेश परदेशी, लहानू ठाकरे, योगेश देवरे, आदी सेवेकरी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल योग विद्या गुरुकुल, नाशिकचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, राज्याचे अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार, आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.