चौगाव येथील लोंबकळणाऱ्या विज तारांपासून धोका..लासुर विद्युत वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या काना डोळा.. कोणाच्या मरणाची वाट पाहतायं काय..? गावकऱ्यांचा सवाल
चौगाव ता.चोपडा(प्रतिनीधी) चोपडा तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी विश्राम सुकदेव धनगर यांच्या मालकीच्या चौगाव शिवारातील गट क्र.४४५/२ या शेतात लासुर फिडर वरील विज वितरण कंपनीच्या तारा ह्या अवघ्या सात फुटापर्यंत लोंबकळत आहेत.या बाबत सदर शेतकरी विश्राम धनगर यांनी संबंधीत लासूर विज वितरण कंपनीचे उपअभियंता टेकाळे साहेब यांच्याशी गेल्या चार महीण्यापासून चार ते पाच वेळेस भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सदरचा प्रकार सांगीतला ,फोटोही पाठवले पण उद्या करतो,परवा करतो अशी उत्तरे दिली गेली.ह्या विजवाहक तारा एवढ्या खाली आल्या आहेत की चालतांना नकळत हात उंच केला केला गेला किंवा बैलांच्या शिंगांनाही या तारांचा स्पर्श होऊ शकतो.
सदरचा प्रकार हा अतिशय धोकादायक असूनही संबंधीत वायरमन,लाईनमन,उपअभियंता कामात चालढकल करत आहेत.या तारांमुळे जिवीतहानी ही होऊ शकते व त्याला उपअभियंता,लाईनमन ,वायरमन व विज वितरण कंपनी जबाबदार राहील तरी विज वाहक तारा त्वरीत वर करण्यात याव्या अशी माहीती शेतकरी विश्राम धनगर,रविंद्र पाटिल,विमलबाई पाटिल यांनी प्रसारमाध्यमांना दिली