कोविड योद्धा महा सन्मान सोहळा पेठ- चेतन ठाकरे यांचा अनोखा उपक्रम
पेठ दि.३१(प्रतिनिधी) : न्यूज G9 महाराष्ट्र या वृत्तवाहिनी तर्फे कोरोना काळात विशेष कामगिरी केलेल्या कर्मचारी वर्गाचा 'सन्मान सोहळा' करंजाळी येथे पार पडला. माजी उपसभापती महेश टोपले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, 'ग्रामीण भागाच्या समस्या चित्रफितीतून मांडायच्या असतील तर पत्रकारीतेला भरपूर वाव आहे. बातम्यांमुळे पत्रकारांना अनेकदा त्रास होतो,परंतु आदिवासी भागातील प्रश्न जोपर्यंत समाजापुढे येत नाही,शासन दरबारी जात नाही तोपर्यंत विकास होणार नाही. त्यामुळे आपले प्रश्न मांडणाऱ्या वृत्तवाहिन्यांची आज गरज आहे.' यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेशभाऊ गवळी, मनिषाताई घांगळे, देवदत्त चौधरी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्र वृत्तवाहिणीचे दिंडोरी प्रतिनिधी संदिप अवधूत व पेठ प्रतिनिधी चेतन ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य,शिक्षण,कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच आशा सेविका,ग्रामसेवक,जनसेवक यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.पत्रकार चेतन ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.पेठ तालुक्यात कोविड काळा लढा देउन पेठ तालुक्याला कोविड मुक्त करणाऱ्या ५० योद्ध्यांना सन्मानित केले गेले.पेठ तालुक्यातला असा पहिला युवा आहे कि त्याने अस कार्य केले आहे कि आजपर्यंत या पेठ तालुक्यात एकाहि युवाने केलेले नाही.हा पहिला युवा आहे कि त्याने येवढं मोठं आणि मोलाचं कार्य केले आहे.असे मा.जी.उपसभापती महेश टोपले यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. चेतन ठाकरे यांच्या कार्याला कवि देवदत्त चौधरी तसेच सर्व उपस्तितांनी मानाचं स्थान दिलं.