*यावल न.पा. मुख्याधिकारी बबन तडवी २८ हजारांची लाच घेतांना अॕन्टिकरप्शन अधिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकले.. जिल्ह्यात फोफावला भ्रष्टाचार.. लालचींची संख्या वाढिस..सामान्य जनतेत चिंता..!*
यावल दि.३०(प्रतिनिधी) –येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना २८ हजारांची लाच घेतांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत रंगेहाथ पकडल्याने सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रशासकिय यंत्रणेत लोभपिपासू वृत्ती वाढीस लागली असल्याने सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वाणी गल्लीतील यावल येथील रस्त्याच्या कामाचे वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना लाच लाच मागितली होती त्याअनुषंगाने
जळगाव येथील तक्रारदाराने तक्रार दिल्यानुसार, यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी, वय-५४ हल्ली मुक्काम राजोरी, ता.पाचोरा, जि.जळगाव (रा.मातृस्नेहा हाऊसिंग सोसा.,इ-वींग, शहाड रेल्वे स्टेशनच्यामागे, कल्याण वर्ग-२) यांनी कामाचे आदेश देण्यासाठी २८ हजार रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष नगर परीषद, यावल येथे त्यांच्या कार्यालयात स्वीकारली म्हणुन त्यांच्यावर लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा यशस्वी करण्यासाठी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.
लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव ०२५७ २२३५४७७, मोबा.क्रं. ९५१८३१३८३२ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.