भुसावळ वेब मिडीया असोसिएशन तालुकाध्यक्षपदी संतोष शेलोडेतर उपाध्यक्षपदी निलेश फिरके यांची निवड
भुसावळ दि.३१(प्रतिनिधी)*वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष ओबीसी नेते श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व नेतृत्वाखाली - वेब मिडीया असोसिएशन चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडीया यांनी जिल्हा उपाध्यक्ष श्री.गणेशभाऊ वाघ व जिल्हा सचिव श्री.स्वप्निलभाऊ सोनवणे व जिल्हा सरचिटणीस श्री.निखीलभाऊ वाणी यांच्या उपस्थितीत भुसावळ तालुका वेब मिडीया असोसिएशन ची कार्यकारिणी जाहीर केली आहे.*
वेब मिडीया असोसिएशन भुसावळ तालुका अध्यक्ष पदी संतोषभाऊ शेलोडे तर तालुका उपाध्यक्ष पदी निलेश भाऊ फिरके यांची निवड करण्यात आली आहे.*भुसावळ तालुक्यात सध्या स्थितीत फक्त चारचं वेब पोर्टल कार्यान्वित आहेत.लवकरच उर्वरीत इतर वेब पोर्टल चे प्रतिनिधी यांना वेब मिडीया असोसिएशन भुसावळ तालुका कार्यकारिणी'त समावेश करण्यात येणार आहे.*निवड झालेले सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.*